Friday, December 30, 2011

खरं सांगा सुखं म्हणजे नक्की काय असतं (sad version)

मूळ गायक: प्रशांत दामले
नाटक: एका लग्नाची गोष्ट

---------------------------------------------------------------------

खरं सांगा सुखं म्हणजे नक्की काय असतं || २ ||
मिळालेलं वाटेस्तोवर ... हातात काही नसतं || २ ||

सुखं म्हणजे दुख्खाचा उरलेला गंध
रडता रडता हसण्याचा ... आवडता छंद

मनं पाखरू हे जगण्यासाठी आसुसलेलं असतं

खरं सांगा सुखं म्हणजे नक्की काय असतं
मिळालेलं वाटेस्तोवर ... हातात काही नसतं
मिळालेलं वाटेस्तोवर ... हातात काही नसतं

सुखं म्हणजे मृगजळ, सुखं म्हणजे पारा,
सुखं म्हणजे शब्द बापुडा ... केवळं वारा

कुठल्या क्षणी .. मुठटी मधुनी निसटून जातं असतं

खरं सांगा सुखं म्हणजे नक्की काय असतं
मिळालेलं वाटेस्तोवर ... हातात काही नसतं
मिळालेलं वाटेस्तोवर ... हातात काही नसतं


टिप: या गाण्याचा दुसरा (सुखद) भाग 'मला सांगा .. सुखं म्हणजे नक्की काय असतं' मी पुढच्या ब्लॉग पोस्ट मधे प्रस्तुत करेन.

No comments: