Saturday, March 21, 2009

Bij ankure ankure - a title song of Gotya (an old marathi serial)

गीतः मधुकर आरकडे.
संगीतः अशोक पत्की, सुरेश कुमार.
गायकः अरूण इंगळे.
दूरदर्शन मालिका: गोट्या.


बीज अंकुरे अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत,
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात? ||धॄ||

बीजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर,
लख्ख प्रकाश निर्मळ, त्यात कष्टाचा पाझर,
हवी अंधारत्या  रात्री, चंद्रकिरणांची साथ,
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात ||१||

अंकुराचे होता रोप, होई रोपट्याचे झाड,
मुळ्या रोवुन रानात, उभे राहील हे खोड,
निळ्या आभाळाच्या खाली, प्रकाशाचे गीत गात,
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात ||२||

नाही झाला महावृक्ष, जरी नसे कल्पतरु,
फुलाफळांचा त्यावरी, नाही आला रे बहरु,
क्षणभरी विसावेल वाटसरु सावलीत,
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात ||३||

@ हेमलता: गाण्याच्या शब्दांची दुरुस्ती केल्याबद्दल धन्यवाद.