Sunday, May 13, 2012

फुलानी रूसवे अशी कोमला तू (phulani rusave ashi komala tu)

फुलानी रूसवे अशी कोमला तू
चित्रपट: क्षण (२००७)
गायक: स्वप्निल बांदोडकर
संगीत: किशोर रानडे
गीतकार: नितीन आखवे
------------------------------------------------------------------------
(गद्य) ही तर फक्त तुझ्या आणि माझ्या क्षणांची कहाणी
तुझ्या माझ्यातले क्षण .. तीच तर आयुष्याची सुखद साठवण...

फुलानी रूसावे अशी कोमला तू
फुलानी रूसावे अशी कोमला तू
सलानी फुलावे अशी प्रेमला तू
फुलानी रूसावे अशी कोमला तू
फुलानी रूसावे अशी कोमला तू

(गद्य) तू... तुझं रूप... तुझं वागणं... खरं तर तुझं सर्वकाही विलक्षण...
पण माझ्या आयुष्यासाठी तू असु नयेस... फक्त आठवण...

तुझा मखमली स्पर्श वार्‍यास होतो
तुझा मखमली स्पर्श वार्‍यास होतो
वाहने विसरतो... तो धुंद होतो...
कसा त्या कळावा तुझा गोड कावा
कोणीही फसावे अशी मृगजळा तू

फुलानी रूसावे अशी कोमला तू
फुलानी रूसावे अशी कोमला तू

असे रूप लपवू नको फार आता
असे रूप लपवू नको फार आता
खुळा जाहला केशसंभार आता
मला गुन्तुदे त्यात भ्रमरा परी गे
कितीदा पीऊ अक्षयी मध फुला तू

फुलानी रूसावे अशी कोमला तू
फुलानी रूसावे अशी कोमला तू
सलानी फुलावे अशी प्रेमला तू
फुलानी रूसावे अशी कोमला तू
फुलानी रूसावे अशी कोमला तू