Saturday, December 31, 2011

ती परी अस्मानीची

ती परी अस्मानीची
मूळ गायक: प्रशांत दामले
नाटक: एका लग्नाची गोष्ट

--------------------------------------------------------------------------

ती परी अस्मानीची  ... ती परी अस्मानीची
ती परी अस्मानीची  ... ती परी अस्मानीची

डोळे तिचे सळसळती माशांची जोडी
ओठ तिचे संत्र्यांच्या रसरसत्या फोडी
गालावरं थरथरते साय दुधाची
अंगावरं चव झरते गोड मधाची

ती परी अस्मानीची  ... ती परी अस्मानीची
ती परी अस्मानीची  ... ती परी अस्मानीची

ती बघते तेंव्हा हृदयात धडधड होते
हसते तेंव्हा भवतीचे सारे भिरभिरते
वळते तेंव्हा बगळ्यान्च्या उडती शुभ्र माळा
सप्तरंगी इंद्रधनू येतसे आभाळा

ती परी अस्मानीची  ... ती परी अस्मानीची
ती परी अस्मानीची  ... ती परी अस्मानीची

Friday, December 30, 2011

मला सांगा सुखं म्हणजे नक्की काय असतं

मूळ गायक: प्रशांत दामले
नाटक: एका लग्नाची गोष्ट

---------------------------------------------------------------------

मला सांगा सुखं म्हणजे नक्की काय असतं
मला सांगा सुखं म्हणजे नक्की काय असतं
काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं

दान घेताना ही झोळी हवी रिकामी
भरता भरता थोडी पुन्हा वाढलेली

आपण फक्त घेताना लाजायचं नसतं

मला सांगा सुखं म्हणजे नक्की काय असतं
मला सांगा सुखं म्हणजे नक्की काय असतं
काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं

देव देतो तेंव्हा छप्पर फाडून देतो
हवय नको ते म्हणणं प्रश्नचं नसतो

आपण फक्त दोन्ही हात भरून घायचं नुसतं

मला सांगा सुखं म्हणजे नक्की काय असतं
मला सांगा सुखं म्हणजे नक्की काय असतं
काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं

मला सांगा...

खरं सांगा सुखं म्हणजे नक्की काय असतं (sad version)

मूळ गायक: प्रशांत दामले
नाटक: एका लग्नाची गोष्ट

---------------------------------------------------------------------

खरं सांगा सुखं म्हणजे नक्की काय असतं || २ ||
मिळालेलं वाटेस्तोवर ... हातात काही नसतं || २ ||

सुखं म्हणजे दुख्खाचा उरलेला गंध
रडता रडता हसण्याचा ... आवडता छंद

मनं पाखरू हे जगण्यासाठी आसुसलेलं असतं

खरं सांगा सुखं म्हणजे नक्की काय असतं
मिळालेलं वाटेस्तोवर ... हातात काही नसतं
मिळालेलं वाटेस्तोवर ... हातात काही नसतं

सुखं म्हणजे मृगजळ, सुखं म्हणजे पारा,
सुखं म्हणजे शब्द बापुडा ... केवळं वारा

कुठल्या क्षणी .. मुठटी मधुनी निसटून जातं असतं

खरं सांगा सुखं म्हणजे नक्की काय असतं
मिळालेलं वाटेस्तोवर ... हातात काही नसतं
मिळालेलं वाटेस्तोवर ... हातात काही नसतं


टिप: या गाण्याचा दुसरा (सुखद) भाग 'मला सांगा .. सुखं म्हणजे नक्की काय असतं' मी पुढच्या ब्लॉग पोस्ट मधे प्रस्तुत करेन.

Thursday, March 10, 2011

कधी तू... (मुंबई-पुणे-मुंबई)

कधी तू... रिमझिम झरणारी बरसात...
कधी तू... चमचम करणारी चांदण्यात...
कधी तू... कोसळत्या धारा ... थैमान वारा.. बिजलीची नक्षी अम्बरा
सळसळत्या लाटा... भिजलेल्या वाटा ... चिंब पावसाची ओली रात...

कधी तू... रिमझिम झरणारी बरसात...
कधी तू... चमचम करणारी चांदण्यात...

कधी तू ... अंग अंग मोहरणारे .. आसमन्त दरवळणारी रातराणी वेड्या जंगलात
कधी तू... अंग अंग मोहरणारे .. आसमन्त दरवळणारी रातराणी वेड्या जंगलात
कधी तू... हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यात..

कधी तू... रिमझिम झरणारी बरसात...
कधी तू... कोसळत्या धारा... थैमान वारा.. बिजलीची नक्षी अम्बरा

सळसळत्या लाटा... भिजलेल्या वाटा ... चिंब पावसाची ओली रात...

कधी तू... रिमझिम झरणारी बरसात...
कधी तू... चमचम करणारी चांदण्यात...

जरी तू.. कळले तरी ना कळणारे... दिसले तरी ना दिसणारे... विरणारे मृगजळ एक क्षणात..
जरी तू.. कळले तरी ना कळणारे... दिसले तरी ना दिसणारे... विरणारे मृगजळ एक क्षणात..
तरी तू.. मिट्लेल्या माझ्या पापण्यात


कधी तू... रिमझिम झरणारी बरसात...
कधी तू... कोसळत्या धारा ... थैमान वारा.. बिजलीची नक्षी अम्बरा
सळसळत्या लाटा... भिजलेल्या वाटा ... चिंब पावसाची ओली रात...

कधी तू... रिमझिम झरणारी बरसात...
कधी तू... चमचम करणारी चांदण्यात...